राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष पेटला आहे. त्यातच संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली. तर संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे देशाबाहेर पळाले असल्याची शंका व्यक्त केली आहे.