भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातच किरीट सोमय्या यांनी ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे सुरू असल्याचा आरोप केला आहे. तर त्याविरोधात किरीट सोमय्या यांनी काळी पुस्तिका काढणार असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर राणा दांपत्याच्या अटकेवरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला.