सौमय्यांच्या आरोपांचा फुसका बार
मोठ्या आवेशात ठाकरे कुटुंबियावर आरोप करणारे भाजप नेते किरीट सौमय्यांच्या आरोपांचा पुन्हा एकदा फुसका बार ठरला आहे. सोमय्यांनी आरोप केलेल्या जमीनी ठाकरे कुटुंबियाने २०१४ मधे खऱेदी केल्या असून नुकत्याच झालेल्या विधानपरीषद निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतित्रापत्रात ठाकरे कुटुंबियांनी याचा उल्लेख केला आहे.;
ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उध्दव ठाकरे यांचे नावे असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. मॅक्स महाराष्ट्रने याबाबत निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरु उध्दव ठाकरेंनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून पाहीले. प्रत्यक्षात या जमीनीचे व्यवहार २०१४ मधेच झाले असून ठाकरे कुटुंबाने याबातचे प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. अन्वय नाईक यांची आत्महत्या २०१८ मधे झाली आहे. वास्तविक आत्महत्या आणि खरेदीशी काहीही संबध नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
जमीन खरेदी करणे चूक आहे का? रवींद्र वायकर यांचा पलटवार
खरेदी झाली होती. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात या व्यवहाराचा उल्लेख केलेला आहे. आयकर विभागाला देखील याचे दस्ताऐवज दिलेला आहे. त्यामुळे हा पारदर्शक व्यवहार असून विरोधक याचे राजकारण करत आहेत. लोकायुक्तांमार्फत या प्रकरणाची आधीच चौकशी झालेली आहे, आणखी काही चौकशी करायची असेल तर करु शकता, असे आव्हानच वायकर यांनी केले. अन्वय नाईक यांनी जमीन विकल्यापेक्षा त्यांनी आत्महत्या कुणामुळे केली? याचा शोध घेतला पाहीजे, असे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.