भाजपला केजरीवालांचं आव्हान; या 5 मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडून दोईन
या जाहीर सभेत बोलताना ५ मागण्यांची यादी आरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली, आणि जर त्या पूर्ण झाल्या तर राजकारण सोडून देतो असं म्हणाले. मी इथे सत्तेसाठी आलो नाही, मी इथे पैसा कमवण्यासाठी किंवा मंत्री तसेच मुख्यमंत्री बनण्यासाठी आलेलो नाही, असंही ते म्हणाले.;
हरियाणामधील जींद याठिकाणी झालेल्या एका जाहीर सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबोधित करताना विरोधी पक्षांवर जोरदार घणाघात केला. या जाहीर सभेत बोलताना आरविंद केजरीवाल यांनी केंद्रातल्या भाजप सरकारपुढे त्यांच्या ५ मागण्या ठेवल्या आहेत, ज्या भाजपकडून पुर्ण झाल्या तर केजरीवाल हे राजकारण सोडून देतील असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर थेट निशाना साधला आहे. त्याचबरोबर भाजपला जर कुणाकडून धोका असेल तर तो आम आदमी पक्षाकडून आहे असं प्रतिपादन केजरीवाल यांनी केलं.
या जाहीर सभेत बोलताना ५ मागण्यांची यादी आरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली, आणि जर त्या पूर्ण झाल्या तर राजकारण सोडून देतो असं म्हणाले. मी इथे सत्तेसाठी आलो नाही...मी इथे पैसा कमवण्यासाठी किंवा मंत्री तसेच मुख्यमंत्री बनण्यासाठी आलेलो नाही, असंही ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांच्याकडून केलेल्या 5 मागण्या
केजरीवाल म्हणाले की, 140 कोटी जनतेच्या वतीने माझी पहिली मागणी या देशाची शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्याची आहे. सर्वांसाठी समान शिक्षणाची व्यवस्था करा. गरीब-श्रीमंत सर्वांना समान शिक्षण मिळाले पाहिजे.
दुसरी मागणी म्हणजे संपूर्ण देशातील प्रत्येकाला चांगली वागणूक मिळावी, मग तो गरीब असो वा श्रीमंत. देशभरातील रुग्णालये दुरुस्त करा.
तिसरी मागणी सांगताना केजरीवाल म्हणाले, 'महागाई कमी करा. दिल्ली आणि पंजाबमध्ये महागाई कमी करून आम्ही हे दाखवून दिले आहे. देशात महागाईबाबत षडयंत्र सुरू आहे.
चौथ्या मागणीचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले, 'प्रत्येक हाताला रोजगार द्या'
पाचव्या मागणीबाबत केजरीवाल म्हणाले की, देशात वीज खूप महाग आहे. जर तुम्ही गरिबांना मोफत वीज दिली आणि संपूर्ण देशातील प्रत्येकाला 24 तास वीज दिली तर मी राजकारण सोडेन.
अरविंद केजरीवाल भाजपला टोला लगावत म्हणाले की, ते सर्वसामान्यांच्या मागे लागतात. ते माझ्या मागे का लागले आहेत, माझा काय दोष? अरविंद केजरीवाल म्हणाले, 'आम्हाला या देशाची शिक्षण व्यवस्था बदलायची आहे, ही आमची चूक आहे. आम्हाला या देशाची आरोग्य व्यवस्था बदलायची आहे. हॉस्पिटल दुरुस्त करायचे आहे. गरिबांना मोफत औषधे द्यायची आहेत. गरिबांवर मोफत उपचार करायचे आहेत. म्हणूनच हे लोक आमच्या मागे लागले आहेत.