कसबा पोट निवडणुकीत धंगेकरांना मनसेची मदत...

गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूकीचे निकाल आज समोर आले आणि अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. नेमके हे खुलासे कोणते आहेत ते नक्की वाचा...;

Update: 2023-03-02 13:37 GMT

कसबा पोटनिवडणूकीत अनेक धक्कादायक खुलासे निकालानंतर समोर आले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवत गेल्या २७ वर्षाच्या भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम केले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आपली प्रतिक्रीया देत धंगेकर यांचे अभिनंदन केले आणि धंगेकर यांनी या पोटनिवडणुकीत कुणीकुणी कशी मदत केली याचा खुलासा केला.

अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज कसबा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर अनेक गौप्यस्फोट केले. त्यामधला महत्त्वाचा गौप्यस्फोट हा होता की, धंगेकर यांना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत केल्याचा...मनसेच्या (MNS ) कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जाऊन सांगितले की, आम्ही रविंद्र धंगेकर यांना मदत करणार आहे. तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा. कुणीही कोणतीही आघाडी केली की, जनतेने ठरवले की, कुणाच काही चालत नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

कसबा पोटनिवडणूकीचा निकाल समोर येण्याअगोदर काही बोलण चुकीचे आहे. म्हणून बोललो नव्हतो. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम सारखी झाली आहे. आम्ही कसब्यात योग्य उमेदवारी दिली. रविंद्र धंगेकर योग्य उमेदवार ठरला. धंगेकर हे तळागाळात काम करणारे नेते आहेत. त्याने महापालिकेतही उत्तम काम केले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने काम केले यामुळे हा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी या विजयानंतर दिली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आणि भाजपाला मोठा धक्का बसला. या पोटनिवडणूकीची जबाबदारी संपूर्णपणे चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र चंद्रकांत पाटील यामध्ये अपयशी ठरले. आणि आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या दोघांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. तब्बल ३० वर्षानंतर काँग्रेसने कसब्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली. यापूर्वी १९९१ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर हे या पोट निवडणुकीत ११ हजार ४० मतांनी विजयी झाले.

NOTE- याबातमीसाठी अजित पवार, रविंद्र धंगेकर आणि राज ठाकरे यांचा कोलाज करुन फोटो वापरणे.

Tags:    

Similar News