छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीतील - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले असून छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केलं आहे.

Update: 2021-01-31 12:57 GMT

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे असून कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत. उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केलं आहे.

भाषावार प्रांतरचनेमुळे बेळगाव, कारवार, निपाणी अस मराठी भाषिक भाग हा भाग कर्नाटक मध्ये गेला. हा मराठी भाषिक भाग महाराष्ट्रत सामील करून घेण्यासाठी ६५ वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत वादग्रस्तभाग केंद्रशासित झाला पाहिजे असं म्हणले होते. या निधनानंतर कर्नाटकात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई हा कर्नाटकचा भाग असून मुंबई कर्नाटकात सामील होईपर्यंत केंद्रशासित भाग घोषित करा असे प्रतिउत्तर दिले. सावादी यांच्या या वक्तव्याची अनेकांनी कडक शब्दात निंदा केली. सावदी यांच्या निधनानंतर आता कार्जोळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेते याबाबत काय म्हणतात...

कर्नाटकात भाजपचं सरकार असून याबाबत महाराष्ट्रातील भाजप नेते गप्प का? असा प्रश्न विचारला जात होता. आता या सगळ्यावर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील ८४२ गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे. कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. या सगळ्या प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार असल्याचं त्यांनी म्हंटले होते.

Tags:    

Similar News