कन्हैयाने कंस मामाचा वध केला, CM शिवराज यांच्यावर कन्हैया कुमारांची टीका
मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर काँग्रेस नेते कन्हेया कुमार यांनी नाव न घेता निशाना साधला आहे.;
मध्य प्रदेशात इलेक्शनच्या आधीच राजकीय शाब्दीक हल्ले- प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. मध्यप्रदेशात इंदोर मध्ये आदिवासी युवा महापंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपवर टीका केली. युवा काँग्रेस चे NSUI चे प्रभारी कन्हैया कुमार म्हणालेत की कंस वध केला आहे मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर काँग्रेस नेते कन्हेया कुमार यांनी नाव न घेता निशाना साधला आहे.
कृष्ण लीलाचे उदाहरण देत कन्हैया कुमार म्हणाला, 'कन्हैयाने कंस का वध कीया था' आणि कंसही त्याचा मामा होता. माझेही नाव कन्हैया आहे. असे म्हणत भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यावर नाव न घेता टीका केलीय. कन्हैया कुमार पुढे म्हणाला की, 'मामाचा मुलगा परदेशात शिकण्यासाठी गेला होता. या राज्यात गरिबांसाठी एकही महाविद्यालय, विद्यापीठ किंवा वसतिगृह बांधले जाणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा मुलगा परदेशात शिकायला जात असेल तर आदिवासींसाठी शाळा, कॉलेज का बांधणार? असा थेट सवालच कन्हैया कुमार यांनी उपस्थित केलं आहे.
ते म्हणालेत आपल्याला डोळे उघडून सत्य पाहण्याची गरज आहे. लोकशाहीचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे एक मत आहे, त्याचप्रमाणे आदिवासीच्या मुलाचे मत देखील एकसमान आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला असला तरी देशाला आम्हीही टॅक्स देतो, त्यामुळे आमच्या मुलांसाठीही चांगल्या शाळा. महिलांना संरक्षण मिळावे, राज्यात रुग्णालये असावीत असं म्हणत त्यानी मुख्यमंत्री शिवराज यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली
कन्हैया कुमार यांनी मुख्यमंत्री शिवराज यांच्यावर आरोप लावला म्हणाले की, हे लोक 20 वर्षांपासून सरकार चालवत आहेत, पण निवडणुकीला 20 महिने बाकी असताना त्यांना 'प्यारी बहिणींची' आठवण येते, ते म्हणतात 'आम्ही 2000 रुपये देऊ' असे ते म्हणत आहेत. परंतु 'तुम्ही 2000 रुपये तुमच्याकडे ठेवता, फक्त 350 रुपयांचा सिलेंडर 1400 रुपयांना का मिळतात? महागाईच्या मुद्यावर देखील कन्हैया कुमार ने मुख्यमंत्र्याना धारेवर धरलं. तर मुख्यमंत्री राज्याची फसवणूक करत असून त्यांचा खेळ आम्हाला समजला आहे, असे ते कन्हैया म्हणाले आहे.