देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती गंभीर- संजय राऊत

Update: 2022-04-14 06:20 GMT

"बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केले आहे, ते संविधान त्याच ताकदीने या देशात , न्यायव्यवस्थेत आणि कायदाच्या क्षेत्रात जिंवत राहो, कारण आज देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर आहे की पदोपदी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते" या शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. रामनवमी या आधीसुद्धा देशात साजरी झाली आहे. पण भविष्यात ज्या राज्यात निवडणूका होत आहेत त्या गुजरात, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई महानगर पालिका क्षेत्रांमध्ये रामनवमीच्या दिवशी जो हल्लाबोल घडवुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला ही निवडणुकांची तयारी आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

Similar News