मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला 'आज तक' ने कामावरुन काढले

Update: 2021-07-19 08:21 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियामधून टीका करणाऱ्या पत्रकाराला आज तक चॅनेलमधून काढून टाकण्यात आले आहे. श्याम मीरा सिग असे या पत्रकाराचे नाव आहे. या पत्रकाराने स्वत: ट्विटवरुन याची माहिती दिली आहे.

श्याम मीरा सिंग यांनी 17 जुलै रोजी पहिल्यांदा एक ट्विट केले होते, त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, "यहाँ ट्विटर पर कुछ लिखता हूँ तो कुछ लोग मेरी कंपनी को टैग करने लगते हैं. कहते हैं इसे हटाओ, इसे हटाते क्यों नहीं... मैं अगला ट्वीट और अधिक दम लगाकर लिखता हूँ. पर इसे लिखने से पीछे नहीं हटूँगा कि Modi is a shameless Prime Minister."

त्यानंतर श्याम यांनी आणखी एक ट्विट दोन तासांनी केले होते, "पंतप्रधान मोदींचा आदर करा असे सांगण्याआधी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा आदर केला पाहिजे"

अशाप्रकारे त्यांनी आपली वैयक्तिक मते मांडली होती. पण त्यांना इंडिया टुडे ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. कंपनीने त्यांना मेल केलवा आङे. श्याम मीरा सिंग यांना कंपनीच्या सोशल मीडिया पॉलिसीचे उल्लंघन केले आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या चॅनेलच्या बातम्या फक्त सोशल मीडियावर टाकाव्या आणि आपली वैयक्तिक मते व्यक्त करु नयेत या धोरणाचे वारंवार उल्लंघन केल्याने आपल्याला काढून टाकण्यात येत आहे, असा मेल कंपनीने त्यांना केला आहे.

एकंदरीतच पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशाप्रकारे गदा आली आहे आणि मोदींविरोधात बोलणाऱ्यांवर काय कारवाई होते, त्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

Tags:    

Similar News