अशा राजकारणात न राहिलेले बरं; जितेंद्र आव्हाड यांनी दिला राजीनामा.

“राज्यात जे राजकारण होत आहे त्या राजकारणात न राहिलेल बरं” असे आव्हाडांनी आपल मत व्यक्त करुन राज्याच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. माझ्यावर लावलेले ३५४ कलम हे मनाला बोचणारे आहे.;

Update: 2022-11-14 11:33 GMT

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावरती व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये महिलेचा हात धरुन "तू इथं काय करतेस" असे म्हणत बाजूल लोटलं, संबंधित महिलेने पत्रकार परिषेद घेऊन आव्हाड यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा नोंद केला त्यानंतर भाजपने आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहि वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवला असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन महिलेने केलेले आरोप फेटाळले. "पोलिसांनी देखील लावलेले आरोप सिद्ध न झाल्यास पोलिसांविरोधात न्यायालयात जाणार" असल्याचे आव्हाडांनी वक्तव्य केले.

"राज्यात जे राजकारण होत आहे त्या राजकारणात न राहिलेल बरं" असे आव्हाडांनी आपल मत व्यक्त करुन राज्याच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील देखील उपस्थित होते. "माझ्यावर लावलेले ३५४ कलम हे मनाला बोचणारे आहे." असे म्हणत आव्हाड भावूक होताना पाहायाला मिळाले. तसेच "माझ्यावरती लावण्यात आलेले आरोप हे एक षडयंत्राचा भाग आहे."

या सर्व वक्तव्यानंतर आव्हाडांनी आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचे जाहीर केले.जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत विनयभंगाचा प्रकार कसा घडला, हे दाखवण्यापूर्वी आव्हाडांनी आरोप केलेल्या महिलेबद्द्ल बहिण असा उल्लेख केला होत. तसेच व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलेल्या प्रकरणाबद्दल विनयभंगाचा प्रकार कुठे बसतो असा सवाल जयंत पाटील यांनी पोलिसांना केला.

Tags:    

Similar News