झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनला ईडी चौकशीचा बसेल फास; झारखंड मुक्ती मोर्चाचं वक्तव्य
मनी लाँड्रींग प्रक्ररणी झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडी चौकशीचा फास आवळला आहे. त्यांना अटक होण्याची भितीसुध्दा झारखंड मुक्ती मोर्चाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामूळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. दरम्यान राज्यातील सत्तांतर टाळण्यासाठी हेमंत सोरेन हे त्यांच्या पत्नी पल्लवी सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवतील, अशी एक चर्चा राजकीय वर्तूळात रंगली असातानाच सीता सोरेन यांनी मुख्यमंत्री पदावर दाना केला आहे.
हेमंत सोरेन यांच्या मोठ्या बंधुच्या पत्नी आणि जामा मतदारसंघातील आमदार असलेल्या सीता सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पद सोडले तर, या पदावर पहिला दावा माझाच राहिल, कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची पसंदी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.मंगळवारी हेमंत सोरेन यांनी मित्रपक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली होती. सीता सोरेन या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. तसेच काही आमदारही या बैठकीपासून दूर राहिले.आज (दि.३१ जानेवारी) सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री हेमंत यांची चौकशी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.