भाजपचा खरा चेहरा उघड- जयराम रमेश

केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले. मात्र याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली आहे.

Update: 2023-09-22 05:14 GMT

Jairam Ramesh criticize to BJP and Modi Government about reject amendment in Women Reservation bill

ऐतिहासिक विधेयक असल्याचा दावा करत केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक आधी लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करून घेतले. मात्र लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करत असताना विरोधी पक्षांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारने महिला आऱक्षण विधेयक मंजूर करून घेतले. याच मुद्द्यावरून जयराम रमेश यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मांडलं होतं. त्यावेळी काँग्रेसने त्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणूकीपासून महिला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी.

अनुसूचित जाती-जमाती प्रमाणे ओबीसी महिलांचाही समावेश करण्यात यावा.

या दोन्ही दुरुस्त्या सरकारला सहजपणे शक्य होत्या. मात्र सरकारने या सुधारणा फेटाळून लावल्या. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची प्रतिक्रीया जयराम रमेश यांनी दिली.

डिलिमिटेशन आणि जनगणना हा मुद्दा पुढे करून सरकार महिला आरक्षण लांबणीवर टाकत आहे. त्यामुळे एक प्रकारे हे विधेयक मांडून पंतप्रधान मोदी यांनी निवडणूकीसाठीचा मुद्दा तयार केला आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

Tags:    

Similar News