राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद मिळणार म्हणजे दुर्दैव: विनायक राऊत
बुडत्याला काडीचा आधार, देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.;
नुकतेच नारायण राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. त्यावेळी त्यांनी शिवेसेनेवर जोरदार टिका केली होती. यावेळी बोलताना शहांनी आता राणेंवर भाजपमधे अन्याय होणार नसल्याचे सांगून राणेंचा योग्य सन्मान होईल असं वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर राणेंची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा आहे. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या सामनातून अमितशहा आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.