शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्ब नंतर आज पुन्हा एक मोठा बॉम्ब महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर पडला आहे. सक्तवसुली संचनालय (ईडीने) फेमा कायद्याअतंर्गत मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले आणि त्याच्या नातेवाईकांची ४०.३४ कोटी रूपयांची मालमत्ता आज जप्त केली.
गेली अनेक वर्ष अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ती प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांच्या मार्फत धाडसत्र सुरू होते.
आयबीच्या परवानगीविना विदेशी बँकेतील अकाउंटमध्ये ५०० कोटी कसे जमा झाले, असा संशय ईडीला आहे. त्यासंबंधी ईडी अधिक तपास करत आहे. याआधीही गेल्यावर्षा नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबरमध्ये ईडीने भोसले यांना मुंबईत चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यानं त्यांची तब्बल दहा तास चौकशी केली होती.
पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ED अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. राज्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर काँग्रेसही आलं. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या मागेही इडीचा ससेमिरा लागला आहे.
विशेष म्हणजे मंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्यावरही ईडीने यापूर्वी कारवाई केली होती.
ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी असून काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत.. तसंच पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत. अविनाश भोसले यांची 27 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने सुमारे दहा सात चौकशी केली होती. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली होती. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापे मारले होते. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. या धाड सत्राचा परिपाक 40 कोटीची मालमत्ता जप्त करण्यामधे झाला आहे.