लॉकडाऊन नको रे बाबा : उद्योगजगताकडून वेगळ्या मार्गानं कोरोना नियंत्रणाची मागणी

दुसऱ्या कोरोना लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असताना कोणत्याही क्षणी लॉकडाऊची घोषीत होण्याची शक्यता असताना उद्योग जगताकडून टाळेबंदीचा जालिम इलाज नको, वेगळ्या मार्गानं कोरोना नियंत्रणात आणा अशी मागणी पुढे येत आहे.

Update: 2021-03-29 13:33 GMT

समाजमाध्यमांवर सक्रीय असलेले महींद्राचे मालक आनंद महींद्रा यांनी ही मागणी उध्दव ठाकरेंकडे केली असून एका ट्विटवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना टॅग करत त्यांच्या जुन्या मागणी नुसार महाराष्ट्रातील सर्वांचे प्राधान्यानं लसीकरण करुन घ्यावे अशी मागणी केली आहे.

सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळं काहीसं चिंता आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. राज्यातील लॉकडाऊनमुळं एका आव्हानाच्या परिस्थितीला तोंड दिल्यानंतर आता कुठे जनता सावरत होती, तोच पुन्हा ही टाळेबंदीची टांगती तलवार सर्वांच्याच गळ्याशी आली. याच बाबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. 

लॉकडाऊनला मध्यमवर्गीय घटकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध का होतो, यामागचं कारणंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं. 'उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होतं. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया', असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. 


The problem, @OfficeofUT ji, is that the people a lockdown hurts most are the poor, migrant workers & small businesses. The original lockdowns were essentially to buy time to build up hospital/health infrastructure. Let's focus on resurrecting that & on avoiding mortality. https://t.co/sRoWonrJEp


टाळेबंदीमुळं समाजातील अनेक घटकांवर याचे थेट परिणाम होतात किंबहुना झालेही आहेत. त्यात आणखी भर टाकण्यापेक्षा काहीशा वेगळ्या मार्गानं मुळ मुद्द्यालाच केंद्रस्थानी ठेवत कोरोना नियंत्रणात आणण्याचाच सल्ला आनंद महिंद्रा यांच्याकडून देण्यात आला आहे.

राज्यात काल सर्वाधिक विक्रमी अशी ४० हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रात्रीची संचारबंदी राज्यभर लागू केली असताना पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यात  लागल्याचे चित्र असून टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. ज्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सरकार राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं अधिक गडद झाली आणि अनेकांना पुन्हा धक्काच बसला आहे.

डॉ. चारुहास यांनी लॉकडाऊन ऐवजी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेऊन नियम तोडणाऱ्यांवर प्रबोधन आणि दंडात्मक कारवाईची सूचना उध्दव ठाकरेंनी केली आहे.


Exactly... right now the focus should be on mass vaccination, and fast


त्यावर उद्योगपती आनंद महींद्रा यांनी पुन्हा त्याची जुनी मागणी उचलून धरत महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या महत्वाचे राज्य असल्यामुळे प्राधान्यानं सर्वांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यासाठी खासगी उद्योग समुहांचे सहकार्य घ्यावे अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Tags:    

Similar News