GDP त वाढ म्हणजे गॅस डिझेल, पेट्रोलच्या किंमतीत वाढ, केंद्र सरकारवर राहुल गांधी यांची टीका
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज महागाई वरुन मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅस च्या वाढलेल्या किंमतीवरून आणि मोदी सरकारने आणलेल्या एनएमपी (नेशनल मोनेटाइजेशन पाइपलाइन) योजनेवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली.
राहुल यांनी एका बाजूला डिमोनेटाइजेशन आणि दूसऱ्या बाजूला मोनेटाइजेशन. या दोन्ही योजनेमुळे शेतकरी, मध्यम वर्ग, गरीबांचं डिमोनेटाइजेशन होत असल्याचा आरोप यावेळी केला आहे. मोनेटाइजेशनमुळे सरकारच्या चार-पाच चांगलं होत आहे. जेव्हा पासून ते सत्तेत आले तेव्हापासून पेट्रोल-डीझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्या आहेत.
जीडीपी म्हणजे 'गॅस-पेट्रोल-डीझेल'
यावेळी राहुल गांधी यांनी जीडीपी चा अर्थ 'गॅस-पेट्रोल-डीझेल' यांच्या भावांमध्ये झालेली वाढ.
"आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात 116 टक्के वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर 42 टक्क्यांनी व डिझेलचे दर 55 टक्के इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव 105 रुपये होता. जो आता 71 रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात 32 टक्के घट झाली आहे. गॅसच्या किंमतीत 26 टक्के घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किंमतीत मात्र 116 टक्के वाढ झाली आहे."
पाहा काय म्हणाले राहुल गांधी?