राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जागी पंतप्रधान मोदी यांचा हसरा फोटो, इंडिया टुडे ट्रोल

इंडिया टुडेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बातमी दिली आहे. मात्र या बातमीमध्ये वापरलेल्या फोटोवरून इंडिया टुडे चांगलाच ट्रोल होताना दिसून येत आहे.

Update: 2023-03-09 03:22 GMT

इंडिया टुडेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बातमी दिली आहे. मात्र या बातमीमध्ये वापरलेल्या फोटोवरून इंडिया टुडे चांगलाच ट्रोल होताना दिसून येत आहे.

होळीच्या उत्सवानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी देशवासियांना शुभेच्छा संदेश दिला. त्याची दखल घेत इंडिया टुडेने बातमी दिली. या बातमीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या फोटोऐवजी पंतप्रधान मोदी (PM Modi Photo) यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यावरून इंडिया टुडेला (India Today Troll) चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर या बातमीत द्रौपदी मुर्मू यांचा फोटो शोधून दाखवा, असं ट्वीट @NarundarM या ट्विटर वापरकर्त्याने केले आहे. (Find Droupadi Murmu pic)

नदीम नक्वी (Nadeem Naqvi) या सामाजिक कार्यकर्त्याने म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जागी पंतप्रधान मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हे चुकीने घडलं आहे की ही नव्या पध्दतीची पत्रकारिता आहे. (New Style of Journalism)

@goswamikeshav यांनी @NarundarM यांचे ट्वीट कोट करून म्हटले आहे की, मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा फोटो इंडिया टुडेच्या कव्हर पेजवर शोधून थकलो. पण मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ (Fourth piller of Democracy) आहे. मात्र सध्या हा चौथा स्तंभ होयबा ची भूमिका बजावत आहे.

@Jaitrejait यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, इंडिया टुडेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कुठलाच फोटो सापडला नाही का?

@Jaitrejait यांच्या ट्वीटवर रिप्लाय देतांना @Samadhan2102 यांनी म्हटलं आहे की, इंडिया टुडेला (India Today) पैसे गौतमदास आणि त्याचा बेबी पुरवतोय मुर्मूजी नाहीत.

इंडिया टुडेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा (greetings of Holi) दिल्या. मात्र या बातमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आल्याने ही पत्रकारितेची नवी पध्दती आहे का? असा थेट सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्यामुळे इंडिया टुडेवर मारण्यात येत असलेला गोदी मीडियाचा (Godi Media) शिक्का आणखी गहिरा होत जात आहे.

Tags:    

Similar News