राज्यसभा निवडणूक : MIM चं ठरलं? मतदान कोणाला करणार याची इम्तियाज जलील यांनी दिली माहिती

राज्यसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजप आणि शिवसेनेकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर MIM भाजपसोबत जाणार की शिवसेनेसोबत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करून एमआयएम कोणासोबत जाणार याचे उत्तर दिले आहे.

Update: 2022-06-10 06:25 GMT

राज्यसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. विविध पक्षांनी आपले आमदार सुरक्षितरित्या विधीमंडळ परिसरात घेऊन आले आहेत. त्यापार्श्वभुमीवर MIM कोणाला पाठींबा देणार हे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे.

MIM चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, भाजपचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाविकास आघाडीला पाठींबा देण्याचे ठरविले आहे. मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह सत्तेत असलेल्या शिवसेनेशी आमचे वैचारिक मतभेद असतील.

त्याबरोबरच जलील यांनी पुढे म्हटले आहे की, MIMचे आमदार असलेल्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत याबरोबरच मुस्लिम आरक्षणाचीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे. तर या मागण्यांबाबत महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याने MIMच्या दोन्ही आमदारांना काँग्रेसच्या इमरान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना विजयासाठी शुभेच्छा असे इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Tags:    

Similar News