Max Maharashtra Impact : मोठा निर्णय : सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे सुरू होणार
राज्यातील वाढत्या कोविड संसर्गामुळे समाजकल्याण विभागाची बंद केलेल्या वसतीगृहांचा प्रश्न Max Maharashtra नं मांडल्यानंतर अखेर शासनाला जाग आली असून वसतीगृह सुरु करण्याचे आदेश समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंनी दिले आहेत.
राज्यातील वाढत्या कोविड संसर्गामुळे समाजकल्याण विभागाची बंद केलेल्या वसतीगृहांचा प्रश्न Max Maharashtra नं मांडल्यानंतर अखेर शासनाला जाग आली असून वसतीगृह सुरु करण्याचे आदेश समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंनी दिले आहेत.
राज्यभरात सोमवार (ता.२४)पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत, त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
हे ही वाचा...
https://www.maxmaharashtra.com/news-update/we-want-to-learn-let-us-learn-hostel-students-in-pune-1098658