तर जयंतरावांची सुट्टी केली असती : चंद्रकांत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यशक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच असून आता त्यांनी गतवर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी कोथरूडला अडकलो. त्यामुळे इस्लामपुरात लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर जयंतरावांची सुट्टी केली असती, असं वक्तव्य केलं आहे.;
पवार काकांबद्दल गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले होते हा इतिहास नाही का ? राष्ट्रवादी दरबारी लोकांची तर भाजपा सामान्य माणसाची पार्टी आहे. आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे तर सुप्रियाला मुख्यमंत्री करतील, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
गतवर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी कोथरूडला अडकलो. त्यामुळे इस्लामपुरात लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर जयंतरावांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते आगामी निवडणुकीत पाहूच अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.