अर्णब गोस्‍वामीचं बरं वाईट झालं तर जबाबदारी महाआघाडी सरकारची असेल - नारायण राणे

If any wrong with Arnab Goswami government-responsible says Narayan Rane

Update: 2020-11-08 09:34 GMT

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले अर्णब गोस्‍वामी यांच्‍या जीविताला धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची असेल, असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर भाजपा नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं म्हटलं.

Full View

अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजपचे नेते वेगळ्या पद्धतीने अरुण गोस्वामी यांचा समर्थन करत असून सकाळीच राम कदम यांनी पायी यात्रा काढून सिद्धिविनायकाचरणी अर्नबच्या सुटकेचे प्रार्थना केली.

"अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल," असं म्हणत नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली

Tags:    

Similar News