बाबो.., अभिजित बिचुकले यांना पुणेकरांनी दिला धक्का
गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या कसबा (Kasba ) आणि चिंचवड विधानसभा (pimpri-chinchwad) निवडणूकीचे निकाल आज समोर आले. या सगळ्या निवडणुकीत शेवटपर्यंत चर्चेत असलेले नाव म्हणजे अभिजित बिचुकले. आता निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागली आहे अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांना किती मते मिळाली? बिचुकले यांचे डिपॉझिट जप्त झाले का? नक्की काय घडलं आहे पहा..;
गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या कसबा (Kasba ) आणि चिंचवड विधानसभा (pimpri-chinchwad) निवडणूकीचे निकाल आज समोर आले. या सगळ्या निवडणुकीत शेवटपर्यंत चर्चेत असलेले नाव म्हणजे अभिजित बिचुकले. आता निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागली आहे अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांना किती मते मिळाली? बिचुकले यांचे डिपॉझिट जप्त झाले का? नक्की काय घडलं आहे पहा..
भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) प्रतिष्ठेची केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे आज निकाल समोर आले. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसाबा मतदार संघात भाजपचा पराभव झाला. एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवलेल्या या निवडणुकीत कसब्यातून उमेदवार असलेले अभिजित बिचुकले यांची देखील तितकीच चर्चा होती. या निवडणुकीला तर त्यांनी अगदी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. अगदी ही निवडणूक जिकणारच असं म्हणणाऱ्या अभिजित बिचुकले यांना मात्र मतदार राज्याने चांगलेच नाराज केले आहे. अगदी त्यांनी जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेच्या अगदी चुराडा केला आहे.
निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर समाजमाध्यमांपासून सर्वत्र एकच चर्चा आहे की अभिजित बिचुकले यांना किती मते मिळाली? तर आता ऐका त्यांना केवळ ४८ मते मिळाली आहेत. बिग बॉसच्या माध्यमातून घराघरात गेलेले बिचुकले जितके त्यांच्या स्टाईल व हटके वागण्यामुळे चर्चेत असतात तितकेच ते राज्यातील कोणतीही निवडणुकीमुळे.. याच कारण अशा अनेक निवडणुका त्यांनी लढल्या आहेत. त्यांनी खासदार उदयनराजे भोसलेंना देखील निवडणुकीच्या माध्यमातून टक्कर दिली होती. असं जरी असलं तरी देखील बिचुकले यांना अद्याप यश काही मिळवता आलेले नाही. आता कसबा पोटनिवडणुकीत त्यांना मिळालेल्या ४८ मतांची सर्वत्र चर्चा आहे...