लाथाटके, बुक्कांबा, हाच शिवसेनेचा महाप्रसाद- छगन भुजबळ
राज्यात दोन दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा दिला आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या महाप्रसादाबाबत वक्तव्य केले आहे.
राज्यात राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तर शिवसैनिकांकडून राणा दांपत्याला महाप्रसाद देण्याची भाषा केली जात आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा महाप्रसाद काय असतो, ते सांगितले आहे.
राज्यात दोन दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा दिला आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या महाप्रसादाबाबत वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रात राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करणार असल्याचे म्हटले आहे. तर मातोश्रीबाहेर शिवसैनिक राणा दांपत्याला महाप्रसाद देणार असल्याचे बोलत आहे. त्यामुळे मी एका शिवसैनिकाला विचारले की, हा महाप्रसाद नेमका काय आहे? त्यावर त्याने सांगितले की, हनुमान चालीसा पठन केली की महाप्रसाद द्यायलाच हवा. त्यामुळे शिवसैनिक महाप्रसाद देणार आहेत. त्या महाप्रसादामध्ये लाथाटके, बुक्कांबा अशा प्रकारे पदार्थ टाकले आहेत, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या महाप्रसादाविषयी सांगितले आहे.
पुढे भुजबळ म्हणाले की, मी त्या शिवसैनिकाला सांगितले की, महाप्रसाद ही प्रेमाने द्यायची गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं म्हणणचं असेल तर बघा. पण महाप्रसाद शांततेने द्यावा, असे यावेळी भुजबळ म्हणाले. ते टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
एके काळी भुजबळ हे सुध्दा कट्टर शिवसैनिक होते. त्याबद्दल बोलताना महाप्रसाद कसा दिला जातो हे भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, शिवसैनिक महाप्रसाद देतांना लाथाटकी, बुक्काकुट अशा प्रकारे विविध प्रकारच्या पदार्थांसह महाप्रसाद देत असतात, असेही यावेळी सांगितले.