गृहमंत्र्यांचा राजीनामा झाल्याशिवाय भाजपचं आंदोलन थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस

अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कोर्टाच्या निगराणीखाली सखोल चौकशी करुन गृहमंत्र्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्याा पत्रकार परीषदेला उत्तर देताना नागपूरमधून दिला आहे.;

Update: 2021-03-21 10:21 GMT

परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेंना पुन्हा नियुक्त केलं, असं शरद पवारांनी सांगितलं. पण त्यांनी सांगितलं ते अर्धसत्य असून परमबीर सिंग यांच्याच कमिटीने सचिन वाझे यांची नियुक्ती केली पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने केली, हे सांगायला शरद पवार विसरले, असंही टोला फडणवीस यांनी हाणला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडले, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Full View


गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? विधीमंडळ सभागृहात गृहविभागावर उत्तरं अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली.

सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमवीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? द्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का, असंही फडणवींसांनी पवारांना प्रत्युत्तर देताना सांगितले.

Tags:    

Similar News