हिंदूनी चार मुले जन्माला घालावीत, २ RSS कडे तर २ विश्वहिंदू परिषदेकडे सोपवावी-साध्वी ऋतंभरां

Update: 2022-04-18 10:38 GMT

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे (VHP)विश्व हिंदू परिषदेने रामोत्सावाचे आयोजन केले होते.यावेळी साध्वी ऋतंभरा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल.त्या म्हणाल्या प्रत्येक हिंदूला ४ मुले झाली पाहिजेत, दोन मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तर दोन विश्व हिंदू परिषदेकडे सोपवायला हवीत.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या रामोत्सव कार्यक्रमादरम्यान साध्वी ऋतंभरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या. 'आता प्रत्येक हिंदूना किमान ४ मुलं असायला पाहिजेत आणि या ४ मुलांपैकी दोन मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)किंवा विश्व हिंदू परिषदेकडे सोपवावे जेणेकरून ते राष्ट्रासाठी योगदान देऊ शकतील, तसंच उरलेली दोन मुलं घरादाराकडे लक्ष ठेवू शकतात असं साध्वी ऋतंभरा म्हणाल्या.

दरम्यान, या आधी देखील अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी 'हिंदु बहुसंख्य असल्याने भारत हा लोकशाही देश आहे. परंतु मुस्लिम योजनाबद्ध पद्धतीने अनेक मुलांना जन्म देऊन त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत, असा दावा केला होता.

दरम्यान, या रामोत्सव कार्यक्रमाविषयी बोलताना साध्वी पुढे म्हणाल्या 'रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली आहे. अशा सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणं हे सौभाग्यच आहे. रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते कारण राम हे अपराजित पौरुषत्वाचे प्रतीक असल्याचं त्या म्हणाल्या तसंच देशातील राजकीय पक्षांनी हिंदूंमध्ये फूट पाडली, पण श्रीरामाचे आचरण संपूर्ण समाजाला एकत्र आणेल असही त्या म्हणाल्या.

Tags:    

Similar News