गिरीष बापटांची अवस्था पाहून आनंद दवेंचा आत्मक्लेष

एका बाजूला सुप्रिम कोर्टात (Supreme court) सत्तासंघर्ष सुरु असताना राज्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा (asembly byelection) प्रचार शिगेला पोचला आहे. आजारी असलेले खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) ऑक्सीजन सिंलिडसहीत प्रचाराला उतरल्याचे पाहून हिंदु महासंघाचे उमेदवार आनंद दवेंनी (Anand Dave) एका दिवसासाठी आत्मक्लेष करत प्रचारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.;

Update: 2023-02-17 06:12 GMT


कसबा विधानसभेच्या आमदार मु्क्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासणेंना उमेदवारी दिली आहे.मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना प्रचार रिंगणात उतरवले होते. काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रचारातून माघारीचे स्पष्टीकरण देताना आनंद दवेंनी हिंदु संस्कृतीचा दाखला दिला आहे.जेव्हा युद्ध भूमीवर शत्रू सोबत लढायचा तेव्हा देखील सहा सात वाजल्यानंतर शत्रूच्या सैन्यातील जखमींची देखील विचारपूस केली जाते.ही हिंदू संस्कृतीची एक पद्धत असताना केवळ एक विधानसभा पोटनिवडणुक जिंकता यावी. यासाठी भाजप गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहे. गिरीश बापट आणि आमचे संबध जवळपास २५ वर्षापासून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख मानतो. गिरीश बापट यांना पाहून काल मला दुःख झाले. त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नसल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे.

गेले काही दिवसापासून खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. मागील पाच वर्षापासून भाजपाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतून गिरीश बापट यांना बाजुला का ठेवण्यात आलं ? भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमात, मेळाव्यात गिरीश बापट यांचा साधा फोटो लावण्याचं औदार्यही भाजपाने दाखवलं नाही.




 

पण आज कसबा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार अडचणीत आल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला गिरीश बापट यांची आठवण झाली. हे एकूणच भाजपाच्या पराभवाचं लक्षण आहे. गिरीश बापट यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. हे पुणेकर कधीही विसरणार नाहीत. तर प्रचंड आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.

पोट निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी पक्षाकडून विरोधी उमेदवाराला धमक्या किंवा विनंती केली जाते असा प्रकार तुमच्या बाबतीत घडला आहे का त्यावर ते म्हणाले की, मला धमक्या वैगेरे काही आल्या नाहीत.मात्र अनेक पक्षाचे नेते, कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहे.त्यामुळे या निवडणुकीत हिंदू महासंघाचा उमेदवार निश्चित होईल असा विश्वास आनंद दवे यांनी व्यक्त केला आहे.

एकंदरीत बंडखोरी आणि परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे एका बाजूला सुप्रिम कोर्टात महाराष्ट्रातील फडणवीस- शिंदे सरकारचे भवितव्य टांगणीला लागले असताना पोटनिवडणुकीत प्रचाराचा रंग वाढला आहे.


Tags:    

Similar News