धोका वाढला...२४ तासात दुप्पट रुग्णवाढ...नवर्षानिमीत्त निर्बंधही जारी
कोरोनाचा धोका वाढला...;
मुंबई - नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच कोरोनाने डोकं वर काढल्या प्रशासनाची चिंता वाढली आहे.गेल्या 24 तासात मुंबईत दुप्पट रुग्णवाढ झाली आहे. तर राज्यात 3 हजार 900 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याला धोका वाढला आहे. त्यामुळे या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने नववर्षाच्या कार्यक्रमांवर निर्बंधही जारी केले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 2 हजार 510 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. तर पालिकेने बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट बुधवारी येणार आहे. तर गेल्या 24 तासात राज्यात 85 ओमिक्रॉन रूग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी 38 रूग्णांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासाची पार्श्वभुमी नाही. त्यामुळे ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, या वाढत्या रुग्णवाढीवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. तर राज्याच्या गृह विभागाने नववर्षाच्या कार्यक्रमांसाठी नियमावली जारी केली आहे. नववर्षानिमीत्त घराबाहेर न पडता साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
31 डिसेंबर आणि 1 जानेवारी निमीत्त मिरवणूका, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तर बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या 50 टक्के आणि खु्ल्या जागेत कार्यक्रमांना आसनक्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थितीची अट टाकण्यात आली आहे. मात्र अशा कार्यक्रमांमध्ये कोणत्याी प्रकारची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे गृहमंत्रालयाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.त्यामुळे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर रूग्ण वाढ वेगाने होत असल्याने धोका वाढला आहे.