Eknath Khadase Vs Gulabrao patil : गुलाबराव पाटील यांनी दिली एकनाथ खडसे यांना ऑफर
गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. त्यातच आता एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावरून गुलाबराव पाटील यांनी उत्तर देतांना एकनाथ खडसे यांना थेट ऑफर दिली.;
एकनाथ खडसे विरुध्द गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी सुरुच असते. दोन्हीही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र आता गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या गाडीत येऊन बसण्याची ऑफर दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित असलेलं पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे हलवण्यात आल्याच्या विषयावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. जिल्ह्यातील नेते निष्क्रिय असल्याने विकासाचे एकेक प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याची टीका खडसेंनी केली होती. खडसेंनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी काय केलं हे पाहण्यासाठी खडसेंनी माझ्या गाडीत येऊन बसावं, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंनी टीका करायच्या आधी कॅबिनेट बैठकीचं प्रोसेडींग बघावं. टीका करतांना त्यांनी सत्य बाजू तपासायला हवी होती. सगळ्यात जास्त काळ मंत्री कोण होतं, विरोधी पक्षनेते कोण होते? असं विचारलं तर काय होईल? असंही गुलाबराव पाटील म्हणाले. मी काय केलं हे पाहण्यासाठी खडसेंनी माझ्या गाडीत बसावं, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.