पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल: पडळकर

पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल: गोपीचंद पडळकर यांची रोहित पवार यांच्यावर जहरी टीका gopichand padalkar on rohit pawar;

Update: 2021-06-18 05:01 GMT

घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. श्रीगोंदा कर्जत चा (Shrigonda Karjat Water Issue) हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेल्या रोहित पवार हे कामामध्ये कधीकधी आणि श्रेयामध्ये सर्वात आधी असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे. Gopichand Padalkar Attacks On Rohit Pawar

आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं रोहित पवार केंद्र सरकार वर बोलतात. मात्र, आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्याकडे मात्र, त्यांचे लक्ष नाही. बारामती ॲग्रो च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्याच्या खाद्यांने मोठे नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचे सांगत रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन असून गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली आहे. Gopichand Padalkar Attacks On sharad Pawar आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल. असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

सरकारमध्ये सावळा गोंधळ

या सरकार मध्ये सगळा सावळा गोंधळ गोंधळ असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या खात्याचा मंत्री आहे, त्या खात्याचे निर्णय दुसराच मंत्री जाहीर करतो. मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील दुसऱ्या मंत्र्याला मान्य मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेने आजपर्यंत कधी अनुभवलेला नव्हता. असा टोला पडळकरांनी लगावला आहे. Gopichand Padalkar on Dhangar issue

Tags:    

Similar News