"टॉप टेन"शिराळा पोलीस ठाण्याचा जयंत पाटलांकडून गौरव

चांगले पोलीस असल्यावर चांगले काम होते, शिवाय लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांनी डोक्याला त्रास सुद्धा होत नाही असं वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील‌ यांनी केलं आहे.;

Update: 2021-12-07 11:45 GMT

सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याचा देशातल्या टॉप टेन यादीत सातवा क्रमांक आल्याबद्दल शिराळा याठिकाणी आयोजित कौतुक सोहळा प्रसंगी पाटील हे बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याने देशातील "टॉप टेन" पोलीस ठाण्याच्या यादीत येण्याच्या बहुमान मिळवला आहे.शिराळा पोलीस ठाण्याने सातवा क्रमांक मिळवत. देशास्तरावर चमकणारे शिराळा पोलीस ठाणे हे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस ठाणे ठरले आहे.स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून केंद्रिय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी हा बहुमान देण्यात येतो.या यशस्वी कामगिरी बद्दल सांगली पोलीस दलाच्या शिराळा पोलीस ठाण्याचा कौतुक सोहळा आज शिराळा याठिकाणी पार पडला.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते शिराळा पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला.तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारयांचा मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचाहस्ते सत्कार करण्यात आला.

चांगला अधिकारी असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे,आणि कोणा वर अन्याय न करणे हे पण महत्वाचे आहे. कोणावरही अन्याय होऊ नये हे आमचे सूत्र आहे.त्यामुळे अधिका-यांनी चांगले काम केल्यास समाजात पोलिसांच्या बद्दल लोकांच्या मध्ये आत्मियता वाढते आणि पोलिसांचे नाव लौकिक वाढतो,असा विश्वासही मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News