Goa Exit poll: काँग्रेस ला पुन्हा एकदा सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज, सरकार कोण स्थापन करणार
उत्तर प्रदेशमधील ७ व्या टप्प्यांचे मतदान पार पडल्यानंतर Exit poll चे आकडे यायला सुरूवात झाली आहे. देशात ५ राज्याच्या विधानसभा निवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.;
उत्तरप्रदेशसह पाच राज्यात मतदान पार पडले आणि निवडणूकीच्या निमीत्ताने उडालेला धुराळा जमिनीवर बसला. मात्र पाचही राज्यात कोण बाजी मारणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभुमीवर देशभरातील विविध संस्थांनी पाचही राज्यातील सात टप्प्यात पार पडलेल्या मतदानाचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यातच उत्तरप्रदेश निवडणूकीबाबत एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
उत्तर प्रदेशमधील ७ व्या टप्प्यांचे मतदान पार पडल्यानंतर Exit poll चे आकडे यायला सुरूवात झाली आहे. देशात ५ राज्याच्या विधानसभा निवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तरप्रदेशमधील ४०३ जागांसाठी , गोव्यात ४० जागांसाठी , पंजाबमध्ये ११७ जागांसाठी, उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आणि मणिपुरमध्ये ६० जागांसाठी मतदान पार पडले. त्यापैकी ४० जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपत आहे. १४ फेब्रुवारी ला गोव्यात मतदान पार पडले होते. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या होत्या. १५ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण त्यांना सरकार स्थापन करता आले नाही.
भाजपने १३ जागा जिंकल्या आणि MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. तर सुरूवातीला मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले.
Goa चा Exit poll काय सांगतो?
गोव्यामध्ये Axis My India नुसार काँग्रेसला १५-२० जागा, भाजपला १४-१८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.