Big Breaking : गोव्यात उत्पल पर्रिकर यांना धक्का

Update: 2022-03-10 07:48 GMT

देशातील पाच राज्याच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये गोव्यातील पणजी विधानसभा मतदार संघाची निवडणूक उत्पल पर्रिकर यांच्या बंडामुळे गाजली. त्यामुळे पणजीत उत्पल पर्रिकर जिंकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र गोव्यात उत्पल पर्रिकर यांना मोठा धक्का बसला आहे.

गोवा निवडणूक पक्षांतरासह उत्पल पर्रिकर यांच्या बंडामुळे गाजली होती. त्यातच आज गोव्यासह पाच राज्यात मतमोजणी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर गोव्यातून धक्कादायक निकाल हाती आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना मतदारांनी नाकारले आहे. तर भाजपचे बाबुश मोन्सेरात यांचा विजय झाला आहे.

उत्पल पर्रिकर यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपचे पणजीची जागा प्रतिष्ठेची केली होती. तर गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजी जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. अखेर मतदारांनी उत्पल पर्रिकर यांना धक्का देत बाबुश मोन्सेरात यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. हा उत्पल पर्रिकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपचा मोठा विजय मानला जात आहे.

उत्पल पर्रिकर यांच्या विजयासाठी शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र अखेर पणजीकरांनी उत्पल पर्रिकर यांना नाकारले आहे. तसेच गोव्यात सध्या भाजप 18, काँग्रेस 12, तृणमुल काँग्रेस 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपची बहूमताच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे.

Tags:    

Similar News