फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे....राज ठाकरेंनी केली भुमिका स्पष्ट

Update: 2024-04-09 16:17 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळाव्याची भव्य सभा नुकतीच पार पडली. या सभेला मनसैनिकांसह हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला कशाचीही अपेक्षा नाही, देशाच्या भवितव्यासाठी सक्षम नेतृत्व हवे म्हणून केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेच्या निवडणूकीत भाजप-शिवसेना राष्ट्रवादी अर्थात बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलताना महाविकास आघाडीचे नेते उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का? असा सवाल करत राज ठाकरेंनी उध्दव ठाकरे यांना चांगलच ऐकवलं आहे.

मराठी माणसांवर टोकाचं प्रेम करतो,

तसं भुमिका पटली नाही तर विरोधही टोकाचाच करतो.

मराठी भाषा आणि मराठी माणसांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी देशात पहिल्यांदा मी त्यांचं नाव सुचवलं, पण नंतरच्या काळात मी जे ऐकत होतो, ते ५ वर्षात दिसत नाही. ज्या गोष्टी पटल्या नाहीत तर त्या स्विकारल्या नाहीत, त्याला टोकाचा विरोध केला.

ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याचं कौतुक करणार, तसा माझा टोकाचा राग आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे असंही म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी माणसांवर, मराठी भाषेवर प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो. पण मला तशी गोष्ट दिसली नाही तर विरोधही टोकाचाच करतो. ३७० कलम रद्द झालं तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या सोशल मिडीयावरून अभिनंदन केलं. मी कधीही व्यक्तीगत टीका करत नाही, उध्दव ठाकरे आणि संजय राऊत हे नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करतात, तशी टीका मी केली नाही. मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून टीका केली नाही तर भूमिका पटल्या नाहीत म्हणून टीका केली. तुम्हाला सत्तेतून हाकलून दिलं, म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करता, असा टोला राज ठाकरेंनी यावेळी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला.

देशाच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

महाराष्ट्र जेवढा कर भरतो, तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक ही देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक असणार आहे. यानंतरही अनेक निवडणूका येतील, त्यामध्ये काय होईल? मी मागच्या वेळी इथेच सभेत म्हणालो होतो की, कॅरण चुकीचा फुटला आहे. कोणती सोंगटी कुठे पडली आहे माहित नाही. माझ्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला मला हवा आहे. सर्वात तरूण देश म्हणून भारताची ओळख आहे. या तरूणांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. १० वर्षानंतर देश म्हतारा व्हायला लागेल, नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष द्यायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. असं राज ठाकरे म्हणाले.


Full View

Tags:    

Similar News