पुरावा द्या नाहीतर माफी मागा, ‘सकाळ’ बातमीवरून वंचित बहूजन आघाडी आक्रमक

Update: 2023-08-30 07:58 GMT

वंचित बहूजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर वंचित बहूजन आघाडीने आपली बाजू मांडली होती. मात्र त्यानंतर दैनिक सकाळ दिलेल्या बातमीमुळे पुरावे द्या नाहीतर माफी मागा, अशी भूमिका वंचित बहूजन आघाडीने घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यावर काँग्रेसने अधिकृत प्रस्ताव द्यावा, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. मात्र त्यानंतरही वंचित बहूजन आघाडी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर वंचित बहूजन आघाडीने अधिकृत प्रस्ताव दिला तरच वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत येण्यावर विचार करेल, असं मत व्यक्त केलं होतं.

त्यानंतरही दैनिक सकाळ या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीने वंचित बहूजन आघाडीने इंडिया आघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे म्हटले. मार त्या बातमीत वंचित बहूजन आघाडीला निमंत्रणच देण्यात आलं नाही, याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे खोट्या बातम्या देणे तात्काळ बंद करावे. लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण होत आहे. त्यासंदर्भात वस्तुस्थितीला धरून बातम्या द्याव्यात. लोक अशा फेक बातम्यांना बळी पडणार नाहीत. मात्र यासंदर्भातील प्रस्ताव असेल तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या अधिकृत सहीने जाहीर करावा, असंही वंचित बहूजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News