अविश्वास प्रस्तावातून विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. ची कसोटी

Update: 2023-08-08 08:05 GMT

#NoConfidenceMotion : केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू झालीय. काँग्रेसकडून खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरूवात केली. दरम्यान, राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ केला. त्यात तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (DerekOBrien) यांनी अधिक आक्रमकता दाखविल्यानं त्यांना या अधिवेशनापूरतं निलंबित करण्यात आलंय.

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी यावेळी चर्चेत सहभागी होतांना केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले,” हा संघर्ष संख्येचा नाहीये. मणिपूरला न्याय देण्याचा विषय आहे. आज मणिपूरची जनता न्याय मागतेय. तिथल्या मुली, विद्यार्थी न्याय मागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत ? त्यांना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले ? काही राज्यांचे मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरचे का नाही बदलले ? अशी प्रश्नांची सरबत्तीच खासदार गोगोई यांनी सरकारवर लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविश्वास ठरावाला १० ऑगस्ट रोजी लोकसभेत उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर तीन दिवस चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेत भाजपकडून ५ मंत्री आणि १० खासदार सहभागी होणार आहेत. यात गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, मंत्री स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि किरेन रिजीजू यांच्यासह १० खासदारांचा समावेश आहे. या दहा खासदारांमध्ये निशिकांत दुबे, राज्यवर्धन सिंह राठोड, रमेश बिधूडी, हिना गावित यांचा समावेश आहे. भाजपच्या वतीनं निशिकांत दुबे यांनी चर्चेची सुरूवात केली. मोदी सरकारविरोधात आलेला हा पहिलाच अविश्वास ठराव आहे.

लोकसभेतील आकडेवारी काय सांगते ?

एकूण जागा – ५४३

रिक्त जागा – ४

विद्यमान सदस्य – ५३९

बहुमताची संख्या – २७१

NDA चं संख्याबळ

NDA एकूण सदस्य संख्या -331

भाजप -301, शिवसेना-13, LJSP-6, अपना दल-2, AIADMK -1, NPP-1, NDPP -1,MNF-1, AJSU-1, SMK-1, NPF-1, अपक्ष 2.

विरोधातील सदस्य संख्या

एकूण सदस्य – १४३

INDIA आघाडीचं संख्याबळ -112

कांग्रेस-51, DMK-24, JDU-16, NCP-5, IUML -3, JKNC-3, JMM-1, केरल कांग्रेस एम-1, VCK-1, RSP-1, शिवसेना (UBT) -6, TMC-23, SP-3, लेफ्ट-5, AAP-1,कुल संख्या-143.

INDIA आघाडीत नसलेले मात्र विरोधी पक्षात असलेल्या सदस्यांची संख्या – १८

BRS-9, AIMIM -2, SD-2, AIUDF -1, RLP -1, SDM -1, JDS-1, अपक्ष-1.

तटस्थ असून अविश्वास प्रस्तावाला विरोध असलेल्या सदस्यांची संख्या – ३७

YSRCP – 22, BJD – 12, TDP – 3

अविश्वास प्रस्तावात सहभागीच न झालेल्या सदस्यांची संख्या – ९

BSP - 9

याचाच अर्थ अविश्वास प्रस्ताव च्या विरोधात NDA 331 + तटस्थ आणि विरोध 37 = एकूण ३६८ सदस्य

Tags:    

Similar News