'प्रसाद लाड हा शिवसेनेचं उष्ट खाऊन मोठं झाला'- खोतकर

प्रसाद लाड हा शिवसेनेचं उष्ट खाऊन मोठं झाला म्हणत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे.;

Update: 2021-08-01 12:00 GMT

'प्रसाद लाड हा शिवसेनेचं उष्ट खाऊन मोठं झाला, पण खाल्ल्या मिठालाही तो जागला नाही.शिवसेना भवन तोडायला आला तर त्याचे हात आणि पाय दोन्हीही शिल्लक राहणार नाही शिवाय त्याची जीभ हासडून टाकू' असा इशारा शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलाय. ईडी, सीबीआयच्या बळावर भाजपची दादागिरी सुरु असून हे जास्त दिवस चालणार नाही असंही खोतकर सांगायला विसरले नाहीत.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेळप्रसंगी शिवसेना भवन तोडू असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. मात्र, आ.लाड यांनी मीडियाने माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सोबतच मी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करत असल्याचे म्हटलं आहे. मात्र, त्यांच्या व्यक्तव्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. माजी मंत्री खोतकर यांनी देखील त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान खासदार संभाजीराजे छञपती हे मराठा आंदोलनाची पुढील दिशा 9 ऑगस्ट रोजी ठरवणार आहे. यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आपण आदर करतो असं सांगत त्यांना दिलेला प्रत्येक शब्द राज्य सरकार पाळत असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. शिवाय ज्या मागण्या प्रलंबित आहे, त्यावर देखील सरकार तातडीने कार्यवाही करत असल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News