महात्मा गांधी यांच्या इतिहासाचे क्रिटीकल विश्लेषण व्हायला हवं- पृथ्वीराज चव्हाण
महात्मा गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान आहे.;
महात्मा गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान आहे. महात्मा गांधी यांचे अर्थशास्त्रीय, विज्ञानवादी विचार होते. मात्र महात्मा गांधी यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या इतिहासाचे टीकात्मक विश्लेषण व्हायला हवं. ज्या गोष्टी आजच्या काळाशी सुसंगत नसतील. त्या गोष्टी आपण सोडून देऊन महात्मा गांधी यांच्या विचारांची नवी मांडणी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवायला हवी, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.