पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोंडी 'महात्मा गांधी वध'
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिन महाविर ज्ञान विज्ञान पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना तुषार गांधी यांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्याविषयी पुस्तकं लिहीली आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिन महाविर ज्ञान विज्ञान पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना तुषार गांधी यांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्याविषयी पुस्तकं लिहीली आहेत. त्यातील एका पुस्तकात 'महात्मा गांधी यांच्या वधाच्या' आधीचा इतिहास सांगितला असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये 20 जानेवारीला करण्यात आलेला बाँबस्फोट, त्यानंतर पकडले गेलेले आरोपी आणि 30 जानेवारीला झालेली महात्मा गांधी यांची हत्या यांचा संदर्भ दिला आहे. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोंडी महात्मा गांधी यांचा वध असा शब्द आला. जो शब्द उजव्या विचारसरणीच्या हिंदूत्ववादी लोकांकडून वापरला जातो.