लिंगायत समाजासाठी स्वायत्त महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ, राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मात्र या महामंडळाला स्वायत्त दर्जा देण्याची मागणी हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला.

Update: 2023-09-08 05:32 GMT

For Lingayat community made a Autonomous Mahatma Basaveshwar Maharaj economic development corporation said Minister Hasan Mushrif Tweet

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर लिंगायत समाजातील पोटजातींसह समाजाला शेती, व्यवसाय तसेच शैक्षणिक लाभ व्हावा, यासाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी हसन मुश्रीफ यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य करून महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती. महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजातील पोट जातींना लाभ देण्याचे धोरण तयार झाले. परंतू बहुसंख्य असलेला लिंगायत समाज यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक महामंडळाला स्वायत्त दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्य सरकारने महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा दिल्याने सरसकट लिंगायत समाजाला याचा मोठा फायदा होणार आहे, असं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News