अखेर प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी

Update: 2024-02-02 10:07 GMT

अखेर आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या मविआच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. त्यांनी या अगोदरच आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी मविआच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे.

महाविकास आघाडीच्यावतीनं प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत करण्यात आलं. या बैठकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि वर्षा गायकवाड इ.नेते हजर होते.




 

महाविकास आघाडीमध्ये सामिल होण्यावरून मान- सन्मानाचा मुद्दा बनून राहिलेल्या वंचित बहुजन आघाडी आता किती जागांची मागणी करणार हे आता पाहावं लागणार आहे. कारण मागच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 4 % मते मिळवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर वंचितने 18 जागांवर प्रभाव पाडला होता .आता वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडी मध्ये सामील होण्याने नक्कीच आघाडीची ताकद वाढली आहे.



वंचितल 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता

वंचित बहुजन आघाडीला 2,3 जागा मिळण्याची शक्यता असून अकोल्याची जागा 100% वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच वंचितला शिर्डी आणि अमरावती या दोन जागा हि मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कॉंग्रेस,सेना,एनसीपी तिन्ही पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत. त्यामुले या जागा वंचित वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News