अखेर अशोक चव्हाणांची ईडापिडा टळली, 51 ब्राम्हणांकडून चव्हाणांचे औक्षण !
नांदेड : आदर्श घोटाळ्याच्या महाभुतामुळे इडीची पिडा लागल्याने काँग्रेसमधुन पळत सुटलेले अशोक चव्हाण अखेर भाजपात सामील झाले आणि त्यांची ईडापिडा टळली असेच म्हणावे लागेल. कारण भाजपात प्रवेश केल्या नंतर, आज पहिल्यांदाच अशोक चव्हाण स्वगृही नांदेडला आले, त्यावेळी त्यांचे औक्षण संस्कृत व वैदिक मंत्रोच्चारात 51 ब्राह्मणांनी केले. दरम्यान हे औक्षण आपल्या वरील ईडापिडा टळली या उद्देशाने चव्हाणांनी केल्याचा सुर अनेकांनी लावला.
तर काहींनी गेले पाच दशके पुरोगामी असणारे अशोक चव्हाण भाजपात जाताच सनातनी झाल्याची कोपरखळीही लावलीय. पण मराठवाड्याची भाजपची राजकीय स्थिती सुधारो अथवा न सुधरो पण भाजपात दाखल होताच, खासदारकी नंतर केंद्रिय मंत्री पदाची आस आणि इडीची हकालपट्टी यामुळे अशोक चव्हाणांची पिडा मात्र टळलीय हे मात्र नक्की.