अखेर अशोक चव्हाणांचा भाजपात जाहीर प्रवेश; फडणवीस, बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती

Update: 2024-02-13 08:41 GMT

राज्याचे माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षांतर सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांची या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती.

काय म्हणाले आशोक चव्हाण ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित आज मी हा प्रवेश करत आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात अन्य काही जिल्ह्यातील संभाव्य लोकांचे पक्षप्रवेश होतील मात्र मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही. असे चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष सोडण्याचा हा निर्णय सोपा नव्हता, मी गेली चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये काम करत असताना एखाद्या पक्षाच्या भूमीकेवर टीका जरुर केली असेल परंतू कुणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही, असंही आशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News