शेतकऱ्यांचं आता आमदारांच्या विरोधात आंदोलन

Update: 2021-03-13 13:39 GMT

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा केंद्रातील भाजप सरकारवर मोठा राग आहे. मोदी सरकारने हे तीन कृषी कायदे केले आहेत. या कायद्याच्या विरोधात येथील शेतकरी भाजपशासीत सरकार विरोधात वारंवार आंदोलन करत आहेत. पंजाबमध्ये कॉंग्रेसचं सरकार आहे. तर हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे.

हरियाणामधील मनोहरलाल खट्टर सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने अविश्वास ठराव मांडला होता. संयुक्त किसान मोर्चाने सर्वपक्षीय आमदारांना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात मतदान करा असं आवाहन केलं होतं. मात्र, भाजपच्या खट्टर सरकारला ५५ विरुद्ध ३२ अशा फरकाने स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर आता राज्यात आमदारांविरोधात राज्यातील जनता एकवटली आहे. या आमदारांच्या विरोधात शेतकरी धरणे आंदोलन करत आहेत. हरियाणाच्या विधानसभेत एकूण 80 सदस्य आहेत. बहुमतासाठी 45 सदस्यांची गरज आहे.

Tags:    

Similar News