सेलिब्रिटींच्या ट्विटमागे भाजपाचे षडयंत्र असल्याचे सिद्ध – सचिन सावंत

Update: 2021-02-16 13:45 GMT

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केल्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या सेलिब्रिटींच्या विरोध ट्विट केले होते. देशात फूट पाडण्याचा प्रयत्न होत कुणी करु नये अशा आशयाचे हे ट्विट होते. पण आता या ट्विटसाठी भाजपनेच या सेलिब्रिटींवर दबाव टाकला होता, हे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

भाजपचे काही नेते आणि सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड झाले असून भाजपा आयटी सेल व भाजपच्याच इतर १२ जणांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच सेलिब्रिटींच्या ट्विटवर एवढा मोठा गदारोळ झाल्यानंतरही सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर यांनी कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने यामागे भाजपचा हात असल्याचे सिद्ध होत आहे, असा दावाही सावंत यांनी केला आहे.

Full View


Tags:    

Similar News