Rohit Pawar | फडणवीस खोटं बोलूनसुद्धा बातम्या होत नाही म्हणून ते शरद पवारांवर बोलतायत

Update: 2023-12-18 07:22 GMT

मराठा आरक्षणावरून बोलून बोलून देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यामुळे ते शरद पवारांवर बोलत आहेत.त्यांना शरद पवारांवर बोलल्या नंतर बातमी होईल म्हणून ते बोलत आहेत.दरम्यान ज्या सभेत ते बोलले त्या कार्यक्रमात त्यांनी यांच्या कार्यकर्त्यांना मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगितले.मग त्यांचा भाजपच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तर मग ते लोकांवर कधी विश्वास ठेवतील अशी प्रतिक्रिया फडणवीस यांच्या वक्तव्यावरून रोहित पवार यांनी दिलीय.

तर प्रकाश आंबेडकर यांनी विरोधीपक्षा विषयी केलेले वक्तव्य हे खरे असुन, नक्कीच आदिवेशना दरम्यान जी आक्रमकता विरोधीपक्षाची दिसायला पाहिजे, ती आक्रमकता दुर्दैवाने दिसत नाही.विजय वडेट्टीवार एकटे प्रयत्न करत आहेत,पण महाविकास आघाडीतील आमच्या विरोधीपक्षा कडून ती आक्रमकता निश्चित दिसत नाही. त्यात स्वाभिमानी महाराष्ट्राचे सत्ताधारी नेते गुजरातच्या दावणीला बांधलेले आहेत.दरम्यान कोणतही आरक्षण मिळावं यासाठी भाजप कडून कधीही प्रयत्न झाला नाही.तर मराठा आरक्षण थांबवण्यासाठी सदावर्ते सारख्या लोकांना समोर करण्याचं काम फडणवीसांच आहे.तर मराठा, OBC आरक्षणावरून भाजप ला फक्त गोंधळ निर्माण करायचा आहे आणि त्या गोंधळाचा फायदा त्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकात घ्यायचा आहे.

Full View

Tags:    

Similar News