मग... बावणकुळेंचे तिकिट का कापले ?

Update: 2020-11-19 05:28 GMT

राज्यातील मंदीर प्रवेशानंतर `मंदीर-वाद` थंडावला असला तरी उर्जावादानं नवं तोंड काढलं आहे. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज सवलत देण्यास नकार जाहीर केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकारवर हल्ला करण्यासाठी उतरले आहे. भाजप सत्ताकाळात उर्जामंत्री असलेल्या चंद्रशेखऱ बावणकुळे यांची फडणवीसांनी तोंड भरुन स्तुती केली. मग बावणकुळेंचे विधानसभेचे तिकीट का कापले ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

२०१९ ची राज्यातील विधानसभा निवडणुक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली. केंद्रीय नेतृत्वानं फ्रि हॅण्ड दिल्यानंतर उमेदवारीमधे फडणवीसांनी पक्षातील ज्येष्ठ नेते प्रकाश मेहता, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावणकुळेंची तिकीट कापले. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंताच्या गोटात खळबळ उडाली होती. भाजपचे १०५ आमदार निवडुन आले असले तरी शिवसेनेने युती तोडल्यामुळं भाजपाला विरोधकांच्या बाकावर बसावे लागले.

आता वीजदरसवलतीवरुन वादाच्या निमित्तानं फडणवीसांना बावणकुळेंची आठवण आली. त्यांनी काल झालेल्या भाजप कार्यकरीणीच्या बैठकीत चंद्रशेखर बावणकुळेंचे जोरदार कौतुक केले. त्यांच्याच काळात तिन्ही उर्जा कंपन्या सक्षम झाल्या. आणि केंद्राकडून जाहीर योजनेचा लाभ महाराष्ट्राला मिळाला असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बावणकुळेंचे टिकीट कापल्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकीट राज्यात नाही तर दिल्लीत काटली. अदानींच्या प्रकल्पाला मदत न करण्याचा फटका बावनकुळे यांना बसला. तसेच अजून एक मोदींच्या उद्योगपती मित्राला मदत केली नाही हे ही दिल्लीत खटकले. भाजपात मोदींच्या उद्योगपती मित्रांचे किती चालतं हे यातून दिसून येते, अशी टिका केली होती.

बावणकुळेंनी मात्र मी विदर्भात पक्षासाठी काम करावे अशी पक्षश्रेष्ठीची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता. मात्र मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडणार, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजपअंतर्गत वाद दिवसेंदिवस खदखदत आहे. एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीची वाट धरली आहे. भाजप सोडताना त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली होती. नुकतेचे माजी खासदार आणि मंत्री जयसिंहराव गायकवाड यांनी भाजपा त्याग करण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री पंकजा मुंडे परळीतून विधानसभा पराभुत झाल्यापासून अलिप्त असून संधी साधुन त्या भाजपा नेतृत्वाला लक्ष करत आहे. भाजपाच्या या अंतर्गत खदखदीची केंद्रीय नेतृत्वानं दखल घेतल्याची माहीती आहे. त्यामुळचं महाविकास आघाडीत उर्जामंत्र्यांला लक्ष करण्यासाठी त्यांनी चंद्रशेखर बावणकुळे स्तुतीचं कार्ड वापरल्यांची चर्चा आहे. एकंदरीत वारेमाप बावणकुळेंची स्तुती करणारे फडणवीस बावणकुळेंचे तिकीट का कापले याचे उत्तर मात्र द्यायला तयार नाहीत, हे विशेष.

Full View
Tags:    

Similar News