कशी होते जिल्हा बॅंकेची निवडणूक?
सध्या जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सतत निवडणूका होत असतात. मात्र, प्रत्येक निवडणुकांचे नियम वेगवेगळे असतात. त्यामुळं जिल्हा बॅकेच्या या निवडणुकीत कोण कोण मतदान करु शकते? कशी पार पडते निवडणूक प्रक्रिया वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट Explain: district bank election how is district bank election held;
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेंची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर आता जिल्हा बॅकेच्या निवडणुकीला वेग आला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीमध्ये महाविकासआघाडी व भाजप हे आता आमना सामने ठाकले आहेत. महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल समोर भाजपच्या शेतकरी पॅनेलने आव्हान निर्माण केलं आहे. एकूण 21 जागांसाठी निवडणूक होत असून 3 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 18 जागेसाठी आता मतदान पार पडणार आहे. 18 जागेसाठी 20 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी 43 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे 18 अर्ज आहेत. तर भाजप प्रणित शेतकरी पॅनेलचे 17 अर्ज आले आहेत. यामध्ये 8 बंडखोर उमेदवार आहेत.
मात्र, त्या अगोदर आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही कशी होते? याचे मतदार कोण असतात? उमेदवार कोण व कोणाला मतदान करायचे अधिकार आहेत? हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या मतदान प्रक्रियेचं अ,ब,क,व क1,क2,क3,क4 या वर्गवारीत विभाजन केले आहे.
अ गट
त्यामध्ये प्रथम अ गट आहे. अ गटात कोणकोणतत्या मतदारांचा समावेश होतो. हे आपण जाणून घेणार आहोत.
विविध विकास सोसायट्या ह्या अ गटात येतात. व अ गटाची एकूण उमेदवार हे 10 असतात. प्रत्येक तालुक्यातील एक उमेदवार असतो. सांगली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. त्यामुळे अ गटाचे 10 उमेदवार आहेत. या दहा उमेदवारांना प्रत्येक तालुक्यात असलेल्या सोसायट्या मधील एका व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे.
या उमेदवाराला मतदान करण्यासाठी विकास सोसायटी ठराव देते. ज्या व्यक्तीला विकास सोसायटी ठराव देते तीच व्यक्ती मतदान करू शकते. तो मतदान करण्याचा अधिकार व मतदान करण्याचे ठराव येथील स्थानिक विकास कार्यकारी सोसायटी स्वतः करते. विकास सोसायटीने ज्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे; तीच व्यक्ती या तालुक्यातील एका व्यक्तीला एक मत देऊ शकते. तसेच एका मतदाराला सहा ते सात व्यक्तीला मतदान करण्याचे अधिकार आहेत. म्हणजे थोडक्यात ती व्यक्ती संचालक मंडळातील सहा ते सात संचालकांना मतदान करू शकते. अ, ब,क,क1,क2,क3,क4, यांना मतदान करू शकते.
ब गट
ब गटात एकूण पाच उमेदवार असतात. हे कोत्याही संस्थेचे सहकारी संस्थेचे चेअरमन, संचालक असू शकतात. त्यामध्ये दोन महिला, एक ओबीसी, एक एस.सी, एक एन.टी प्रवर्गातील उमेदवार असे मिळून ब गटात एकूण पाच उमेदवार असतात. या उमेदवारांना सर्व गटातील व्यक्ती मतदान करू शकते.
क 1 गट
क 1 गटात एकूण एकच उमेदवार असतो. या या उमेदवाराला प्रक्रिया गट असे म्हणतात. यामध्ये कारखान्याचे चेअरमन, ऑइलमिलचे चेअरमन, सूतगिरणीचे चेअरमन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन व प्रक्रिया करणारे जे सहकारी संघ आहेत. त्यांना या गटातील उमेदवाराला मतदान करायचे अधिकार आहेत. व उर्वरित सहा सचालकांना देखील ते मतदान करु शकतात.
क 2 गट
क 2 गटात एकूण एकच उमेदवार असतो. हा गट क 2 गट इतर शेती संस्थांचा सहकारी संस्थांचा गट आहे. त्यामध्ये दूध संस्था, पशू संस्था, कुक्कुटपालन संस्था, शेळी-मढी पालन संस्था, पाणी संस्था, मस्य पालन या संस्थांचा समावेश होतो. या संस्था सहकारी संस्था असाव्यात. दुय्यम निबंधकाकडे या संस्थांचे रजिष्टर असले पाहिजे. अशी अट आहे. या संस्थांना या गटातील संचालकाला व उर्वरित सहा संचालकांना मतदान करण्याचा अधिकार आहे.
क 3 गट
क 3 गटात एकूण दोन उमेदवार असतात. क 3 या गटात नागरी बँका, नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पगारदार नोकर यांच्या संस्था, या संस्थेमधील जे चेअरमन आहेत. त्या चेअरमनला या गटातील उमेदवाराला व इतर सहा उमेदवारांना मतदान करण्याचे अधिकार आहेत.
क 4 गट
क 4 गटात एकूण दोन उमेदवार असतात. यामध्ये ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था, औद्योगिक मजूर संस्था, व्यक्तिगत सभासद या लोकांना मतदान करण्याचे अधिकार आहेत. या सदस्यांना (क 1 व क 2) गटांमधील लोकांना स्वतःला एक मतदान व ब गटातील 5 उमेदवारांना मतदान करण्याचे अधिकार आहेत. तर (क 3, व क 4) मधील लोकांना स्वतःला दोन व ब गटातील 5 उमेदवाराला 5 मतदान करण्याचे अधिकार आहेत.
राजकीय रणधुमाळीला सुरुवात...
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर निष्फळ झाल्याने आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होताना दिसत आहे. आघाडीच्या तीन उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्यानं आता उर्वरित 18 जागांसाठी चुरस रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी आश्चर्यकारकरित्या माघार घेतल्याने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला
या निवडणुकीत मंत्री जयंत पाटील स्वत: उभे नसले तरी त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणूकीत माजी आमदार मोहनराव कदम, जत मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत, माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे नातू विशाल पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे भाऊ संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, माजी आमदार मदनभाऊ पाटील यांची पत्नी जयश्री पाटील, माजी गृहमंत्री आरआर पाटील यांचे भाऊ सुरेश पाटील यांच्यासह विद्यमान बॅकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्यासारखे अनेक दिग्गज उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.