अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश;
अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.