रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला - विजय वडेट्टीवार

जामीनावर बाहेर असलेल्या निलेश घायवाळ गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी केली जात आहे. सामान्य माणूस मात्र, मंत्रालयाबाहेर रांगेत उभा यालाच म्हणायचे का अच्छे दिन म्हणायचे का ? विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारला सवाल;

Update: 2024-02-06 10:51 GMT

Mumbai : महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन असा सवाल करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या मुद्यांवरून सरकारवर आज पुन्हा जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मंत्रालयाच्या परिसरात गुंड निलेश घायवाळ यांनी रिल्स शुट केल्याने ती सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरलं होत आहे. त्यामुळे सरकारविरोधात विरोधक आक्रमक होत आहेते

मुंबई येथे 'प्रचितगड' या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, "रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना, काही मंत्र्यांच्या मुलांना याचे काहीच वाटत नाही. म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट आहे. गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतायत आणि सामान्य जनता मात्र बाहेर रांगेत उभे असते. याची सरकारला लाज देखील वाटत नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.


Full View


Tags:    

Similar News