त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत ; संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे वर केली टीका...

ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या सुषमा अंधारे आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’ च्या माध्यमातून ती असंख्य मतदारसंघात फिरत आहे. त्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवर कडाडून टीका करत आहेत.;

Update: 2023-03-27 03:19 GMT

ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या सुषमा अंधारे ( sushma andhare ) आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’ च्या माध्यमातून ती असंख्य मतदारसंघात फिरत आहे. त्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवर कडाडून टीका करत आहेत. या दौऱ्यात त्या वारंवार शिंदे गटाच्या आमदारांना ‘माझे भाऊ’ म्हणून संबोधत आहे.

या सगळ्या टिकेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… अशी टीका संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) म्हणाले, "ती बाई सर्वांना तिचा भाऊ मानते. सत्तार भाऊ आणि भुमरे भाऊ हे माझेच भाऊ आहेत. पण तिने काय लफडी केली हे तिलाच माहिती.आम्ही गेले ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही आमचे नेतृत्व करायला आला आहात,उरलेले लोकं टाळ्या वाजवण्यापुरत्या आहेत. संजय शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे त्यांच्याशी संवाद साधताना. राजकारणात काहीही शक्य आहे. बादासने मला सांगितलं बाई (सुषमा अंधारे) खूप डोक्याच्या वर झाली. 

Tags:    

Similar News